Saturday, 5 August 2023

औद्योगिक कचराः भारतातील सद्यःस्थिति

घनरूप, द्रवरूप अथवा गाळ असणारा द्रवरूप पदार्थ; ज्याच्या स्थायीभावामुळे, रासायनिक घटकांमुळे वा संसर्गामुळे प्राण्यांचा मृत्युवा इजा होत असल्यास किंवा पर्यावरणाला धोका संभवत असल्यास अशा कचर्‍याला घातक कचरा संबोधले जाते. 

घातक कचर्‍याचे काही गुणविशेषः 
धातूंना गंज आणण्याची क्षमता (क्षरण)
अभिक्रियाकारकता
पेट घेण्याची क्षमता
विषारी घटक
स्फोटक 
आत्यंतिक विषारी पदार्थ
संसर्गकारकता 

वरील उपद्रव करणार्‍या पदार्थांचे म्हणजेच घातक कचर्‍याचे नियोजन व विल्हेवाट कशी करतात?

कचर्‍याची निर्मिती कमी होईल अशी प्रक्रिया वापरणे ही पहिली पायरी आहे. यानंतर अशा कचर्‍यातून 'रिकव्हरी' अर्थात जे पदार्थ पुनः वापरण्याजोगे आहेत ते काढून घेऊन पुनर्वापर होऊ शकतो. उदाहरणार्थः तांब्याची निर्मिती करताना तांबे धातुयुक्त गाळ शिल्लक राहतो,यातील तांबे 'रिकव्हर' करून कचर्‍याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. 

अशा पदार्थांचा पुनर्वापर होऊ शकतो. कचर्‍यातील काही पदार्थ रिसायकल करता येऊ शकतात. म्हणजेच, कागदनिर्मिती कारखान्यात तयार कागद कापल्यावर राहणारे तुकडे परत वापरले जातात, प्लास्टीकच्या पेलेट्सपासून दोरखंड तयार करणारे कारखाने या प्रक्रियेत जमिनीवर सांडणारे प्लास्टीक परत तापवून वापरतात व अशाप्रकारे पुनर्वापर केला जातो. 

जो कचरा पुनर्वापर करण्यासारखा नाही त्याला शास्त्रशुद्ध क्षेपणभूमि अथवा 'अग्निदेवाच्या स्वाधीन' केले जाते म्हणजेच 'incinerator'मधे जाळले जाते. 
उदाहरणार्थ sludge म्हणजेच दूषित औद्योगिक पाण्यावर प्रक्रिया केल्यावर जो गाळ राहतो त्यातील बरेचसे गाळांचे प्रकार 'शास्त्रशुद्ध क्षेपणभूमीत' (secured landfill)मधे पाठवतात, तर adhesive waste म्हणजे गोंद तयार करताना झालेला कचरा मात्र incineratorमधे जाळण्यासाठी पाठवला जातो, त्याचप्रमाणे कुठच्याही प्रकारचा रूग्णालयातील कचरा incineratorमधेच जाळला जातो.  

भारतात अेकूण ३०,८८,३८७ टनप्रतिवर्ष पुनर्वापरायोग्य औद्योगिक घातक कचरा तयार होतो. 
४,१५,७९४ टनप्रतिवर्ष जाळण्यायोग्य घातक औद्योगिक कचरा तयार होतो.
२७,२८,३२६टनप्रतिवर्ष इतका कचरा शास्त्रशुद्ध क्षेपणभूमीचा आसरा घेतो. 

घनकचरा नियोजनाची फ्रेंचकथा!

फ्रान्स हा ६ कोटी लोकसंख्येचा बारिकसा देश.  २०१६ मधे साधारण ४.६टन कचरा प्रत्येक नागरिकामागे हा देश तयार करत होता. यातला ८०,००० टन कचरा तिथल्...