फ्रान्स हा ६ कोटी लोकसंख्येचा बारिकसा देश.
२०१६ मधे साधारण ४.६टन कचरा प्रत्येक नागरिकामागे हा देश तयार करत होता. यातला ८०,००० टन कचरा तिथल्या नद्या तलाव प्रदूषित करी व १०,०००टन कचरा भूमध्य समुद्राच्या स्वाधीन होत असे, कारण हा ९०,०००टन कचरा नियोजन व्यवस्था अपुरी असल्याने त्यातून निसटत असे.
२०२० या वर्षात Anti waste law 2020 हा अधिनियम मंजूर करून फ्रान्सनी कचरा व्यवस्थापनात बदल केले. कचरा वाहून नेण्याची व्यवस्था, कचर्याची निर्मिती करणारे, ग्राहक अशांना नवीन व्यवस्थेची माहिती करून चक्र अर्थव्यवस्था (circular economy) प्रस्थापित करून कचरा कशाप्रकारे परत वापरता येईल आणि नद्या, तलाव समुद्र यांपासून दूर राहील याची काळजी सगळ्यांनी घेतली.
कचर्यातील वेगवेगळे घटक वेगवेगळे गोळा करण्यासाठी विविधरंगी कचरापेट्या व प्रत्येक उत्पादनावर ते कोणत्या रंगाच्या कचरापेटीत जाईल त्याची नोंद केली.
नागरिकांनीही त्याप्रमाणे सरकारला साथ देऊन कचरा वेगळा केला. या नवीन व्यवस्थेमुळे जवळपास ७०,००० नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आणि नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचं प्रदूषण थांबलं.