Saturday, 29 July 2023

औद्योगिक कचराः भाग पांच


औद्योगिक कचर्‍याच्या प्रक्रिया व त्यातून तयार होणारा कचरा यासंबंधित हा शेवटचा भाग.

२६. कृत्रिम रंगनिर्मिती
२६.१ प्रक्रियेतील गाळ, विषारी धातू, इ.
२६.२ वायुशुद्धीकरणात तयार झालेली धूळ
२६.३ वाया गेलेली अॅसिड्स 
२६.४ वाया गेलेले द्रावक.
२६.५ वाया गेलेले अुत्प्रेरक

२७. सिलिकाॅन निर्मिती
२७.१ प्रक्रियेतील गाळ 

२८. औषधनिर्मिती प्रक्रिया
२८.१ प्रक्रियेतील गाळ व कचरा
२८.२ वाया गेलेले अुत्प्रेरक
२८.३ वाया गेलेला कार्बन
२८.४ अनिर्देशित उत्पादने
२८.५ मुदतबाह्य उत्पादने
२८.६ वाया गेलेले द्रावक.

२९. कीटकनाशक निर्मिती
२९.१ प्रक्रियेतील कचरा
२९.२ कीटकनाशक असणारा गाळ
२९.३ अनिर्देशित व मुदतबाह्य उत्पादने 
२९.४ वाया गेलेले द्रावक
२९.५ वाया गेलेले उत्प्रेरक
२९.६ वाया गेलेली अॅसिड्स 

३०. चामडे उद्योग
३०.१ क्रोमिअमचा कचरा

३१. इलेक्ट्राॅनिक उद्योग
३१.१ प्रक्रियेतील गाळ व कचरा
३१.२ वाया गेलेली अॅसिड्स व रसायने 

३२. कागद निर्मिती उद्योग
३२.१ वाया गेलेली रसायने
३२.२ अॅसिड व अल्कधर्मी कचरा
३२.३ प्रक्रियेतील गाळ

३३. घातक रसायने व कचरा हाताळणी
३३.१ रिकामे व वाया गेलेले कंटेनर, बॅरल्स 
३३.२ सांडपाणी प्रक्रियेतील गाळ

३४. घातक कचरा हाताळणीदरम्यान केली जाणारी स्वच्छता
३४.१ रसायनयुक्त गाळ
३४.२ बॅरल्स व कंटेनर स्वच्छता करताना तयार झालेला गाळ 

३५. सांडपाणी, वायुप्रक्रिया यातील कचरा
३५.१ वायुशुद्धीकरण प्रक्रियेतील गाळ
३५.२ रेझिन असलेले घातक धातू 
३५.३ सांडपाणी प्रक्रियेतील गाळ 
३५.४ तेल व ग्रीसचा कचरा
३५.५ क्रोमिअमचा गाळ

३६. आॅरगॅनिक रसायनांचे शुद्धीकरण 
३६.१ गाळप प्रक्रियेतील कचरा

३७. घातक कचरा निर्मूलन प्रक्रिया 
३७.१ वेट स्क्रबरमधील कचरा
३७.२ ज्वलन प्रक्रियेतील राख
३७.३ बाष्पीभवन केल्यावर उरणारा गाळ

३८. जड मूलद्रव्यांवरील प्रक्रिया 
३८.१ प्रक्रियेतील गाळ 
३८.२ वाया गेलेली अॅसिड्स 

वरील तीन प्रकरणांमधे आपण एकूण ३८ प्रकारच्या कारखान्यांतील प्रक्रियांमधे तयार होणारे कचर्‍याचे शंभरेक प्रकार पाहिले. यावरून, या प्रश्नाची व्याप्ती किती असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. पुढील भागात या कचर्‍याची हाताळणी कशी केली जाते, त्यासंबंधीचे नियम जाणून घेऊ.

Sunday, 23 July 2023

औद्योगिक कचराः भाग चार (औद्योगिक प्रक्रिया व त्यातून निर्माण होणारा कचरा)



मागील भागात आपण १० औद्यौगिक प्रक्रिया व त्यातील कचर्‍याचे प्रकार पाहिले. या भागात आणखी प्रकारांची ओळख करून घेऊ. 

११. अॅल्युमिनिअमचे प्राथमिक व दुय्यम उत्पादन
११.१ वायुप्रक्रियेतील गाळ 
११.२ कॅथोडमधील कचरा
११.३ डांबर असलेला कचरा
११.४ फ्लू गॅसची भुकटी व इतर 
१२.१ अॅसिड्स व अल्कलीचा कचरा
१२.२ वाया गेलेले अॅसिड्स व अल्कली
१२.३ सल्फाईड, सायनाईड, व विषारी गाळसाळ
१२.४ आॅरगॅनिक द्राव 
१२.५ फाॅस्फेट असणारा गाळ
१२.६ रंग लावण्याच्या प्रक्रियेतील गाळ 
१२.७ तांबेयुक्त गाळ
१२.८ प्लेटींग करण्याच्या प्रक्रियेतील गाळ

१३. स्टील व लोखंड उत्पादन 
१३.१ वाया गेलेले भिजवून ठेवण्याचे द्रव 
१३.२ अॅसिड असलेला गाळ 
१३.३ बेंझोईक अॅसिड असणारा गाळ
१३.४ टाक्यांमधील डांबरयुक्त गाळ
१३.५ डांबर साठवण टाकीतील गाळ
१३.६ भाजण्याच्या प्रक्रियेतील गाळ

१४. लोखंडाचे मजबूतीकरण 
१४.१ सायनाईड, नायट्रेट व नायट्राईट असलेला गाळ 
१४.२ वाया गेलेले मजबूतीकरण करण्यासाठी वापरलेले द्रव 

१५. अॅसबेस्टाॅस प्रक्रिया. 
१५.१ अॅसबेस्टाॅस कचरा व धूळ 
१५.२ फेकलेले अॅसबेस्टाॅस
१५.३ वायुप्रक्रियेतून तयार झालेली धूळ.

१६. धुण्याचा सोडा निर्मिति प्रक्रिया.
१६.१ पारा असलेला गाळ
१६.२ गाळप केल्यावर शिल्लकचा कचरा
१६.३ ब्राईन स्लज

१७. क्षारयुक्त अॅसिड निर्मिती
१७.१ धूळ, प्रक्रियेतून तयार होणारा गाळ
१७.२ वाया गेलेले अभिक्रियेतील उत्प्रेरक

१८. नत्रयुक्त व इतर खतनिर्मिती
१८.१ वाया गेलेले उत्प्रेरक
१८.२ कार्बनचा कचरा
१८.३ अर्सेनिकयुक्त कचरा
१८.४ कूलींग टाॅवरमधील क्रोमिअमयुक्त कचरा

१९. फिनोल निर्मिती
१९.१ फिनोलयुक्त कचरा
१९.२ वाया गेलेले उत्प्रेरक

२०. विद्रावक (solvent) निर्मिती व उद्योगातील वापर
२०.१ वाया गेलेले विद्रावक (aromatic, aliphatic & napthenic 
२०.२ वाया गेलेले विद्रावक
२०.३ गाळप करून राहिलेला कचरा
२०.४ प्रक्रियेतील कचरा

२१. रंग, शाई व संबंधित पदार्थनिर्मिती
२१.१ प्रक्रियेतील कचरा, 
२१.२ वाया गेलेले विद्रावक.

२२. प्लास्टीक निर्मिती
२२.१ वाया गेलेला विद्रावक
२२.२ प्रक्रियेतील कचरा

२३. गोंद, सिमेंट, रेझीन व अधेझिव निर्मिती
२३.१ कचरा (वनस्पतीज व प्राणिज कचरा वगळतां) 
२३.२ वाया गेलेले विद्रावक. 

२४. कॅनव्हास व कापड निर्मिती
२४.१ रसायनांचा कचरा

२५. लाकूड सुरक्षित ठेवणार्‍या पदार्थांची निर्मिती
२५.१ रसायनांचा गाळ
२५.२ अल्कलीयुक्त कचरा

(क्रमशः) 

Sunday, 16 July 2023

औद्यौगिक कचराः भाग तीन (औद्योगिक प्रक्रिया व त्यातून तयार होणारा कचरा)

औद्योगिक कचरा व त्याची तोंडओळख मागील भागांत झाली. या भागापासून आपण वेगळाल्या औद्योगिक प्रक्रिया व त्यांमधून तयार होणारा कचरा याचं वर्गीकरण पाहूया.

प्रशासकीय सोयीसाठी प्रत्येक प्रक्रियेला सरकारने क्रमांक दिले आहेत व त्या प्रक्रियेतून तयार होणार्‍या कचर्‍यास उपक्रमांक दिलेले आहेत. 

१. खनिज तेल प्रक्रियाः 
१.१ रिअॅक्टरमधे शिल्लक रहाणारा कचरा
१.२ डांबराचे अवशेष 
१.३ तेलकट अवशेष
१.४ जैविक अवशेष 
१.५  अल्कधर्मी पदार्थातून धुतल्यावर पेट्रोलीअम पदार्थाचे शिल्लक अवशेष 
१.६ वाया गेलेले उत्प्रेरक (catalyst) व इतर पदार्थ
१.७ खराब पाण्याची प्रक्रिया केल्यावर त्यातून निघणारे तेल 

२. खनिज तेल व नैसर्गिक वायू निर्मिती
२.१ जमिनीत खोदकाम केल्यावर तयार होणारा मातीव्यतिरिक्तचा कचरा
२.२ तेलकट गाळ
२.३ ड्रिलींग केल्यानंतर निघणारी तेलकट माती. 

३. खनिज तेल साठवण करणार्‍या टाक्यांची स्वच्छता
३.१ तेलकट गाळ, कार्गोमधे साचलेला गाळ, टाक्या धुतल्यावर शिल्लक राहणारे पाणी
३.२ रसायनयुक्त गाळ, व कार्गोमधील गाळ 
३.३ तेलकट गाळ व तेलकट फिल्टर्स 
३.४ बोटींमधील तेलकट पाणी

४. खनिजतेल गाळण्याची प्रक्रिया/ वापरलेले तूल गाळण्याची प्रक्रिया/ वाया गेलेल्या तेलाचे पुनःचक्रीकरण 
४.१ तेलकट गाळ 
४.२ वाया गेलेले अुत्प्रेरक
४.३ पाण्यात वा मातीत मिसळलेले खनिज तेल (slop oil) 
४.४ जैविक गाळ 
४.५ वाया गेलेले मातकट तेल 

५. मिनरल आॅईल वा कृत्रिम तेल वंगणाप्रमाणे वापरून काम करणारी हायड्रोलिक यंत्रे 
५.१ वाया गेलेले तेल
५.२ कचरा असलेले तेल 
५.३ वाया गेलेले तेल (एखादा पदार्थ कापण्यासाठी वंगण म्हणून वापरलेले व नंतर काहीएक उपयोग नसलेले तेल)

६. दुय्यम निर्मिती व/किंवा जस्ताचा (zinc) औद्योगिक वापर करणार्‍या प्रक्रिया 
६.१ झिंक सल्फेट प्रक्रियेत तयार झालेले गाळाचे अवशेष 
६.२ जस्ताची धूळ/राख
६.३ जस्त प्रक्रियेतील इतर कचरा
६.४ फ्लू गॅस 

७. जस्त, लोह, ताम्र व शिसं यांची निर्मिती 
७.१ भाजण्याच्या प्रक्रियेतील फ्लू गॅस 
७.२ प्रक्रियेतील गाळसाळ 
७.३ अर्सेनिक असलेला गाळ 
७.४ लोहाव्यतिरिक्तचे धातू असलेला गाळ 
७.५ वायुशुद्धीकरण यंत्रातील (scrubber) गाळ 

८. ताम्र दुय्यम निर्मिती
८.१ वाया गेलेला जलविद्युत विद्राव्य द्रव (electrolyte) 
८.२ गाळण्याच्या प्रक्रियेतील कचरा
८.३ फ्लू गॅसची धूळ 

९. शिसे दुय्यम निर्मिती 
९.१ शिसे असणारा गाळ 
९.२ शिसे असलेली राख 
९.३ बॅटरीचा कचरा 

१०. कॅडमिअम व अर्सेनिक रसायनांचा वापर करणारी प्रक्रिया
१०.१ कॅडमिअम व अर्सेनिक असणारा गाळ. 

या भागात १० औद्योगिक प्रक्रियांमधून कोणत्या प्रकारचा कचरा होतो ते आपण पाहिले, पुढील दोन भागांत शिल्लकचे प्रकार आपण पाहूया... 
(क्रमशः) 

घनकचरा नियोजनाची फ्रेंचकथा!

फ्रान्स हा ६ कोटी लोकसंख्येचा बारिकसा देश.  २०१६ मधे साधारण ४.६टन कचरा प्रत्येक नागरिकामागे हा देश तयार करत होता. यातला ८०,००० टन कचरा तिथल्...